—Advertisement—

Jalgaon Airport : 27 ऑक्टोबरपासून जळगाव ते पुणे दररोज विमानसेवा; ऍडव्हान्स तिकीट विक्री सुरू…!

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: October 18, 2024
Jalgaon Airport : 27 ऑक्टोबरपासून जळगाव ते पुणे दररोज विमानसेवा; ऍडव्हान्स तिकीट विक्री सुरू…!

—Advertisement—

Daily flights from Jalgaon to Pune : गोवा-जळगाव-पुणे विमानसेवा सध्या आठवड्यातून चार दिवस Fly91 द्वारे सुरू आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता आता जळगाव ते पुणे विमानसेवेची वारंवारता वाढवून 27 ऑक्टोबरपासून जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव ते पुणे येथे नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी नियमितपणे प्रवास करणार आहेत.

Jalgaon Airport Pune Flight Update : जळगाव ते पुणे दररोज विमानसेवा गोवा-जळगाव-पुणे विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता आम्ही दररोज गोवा-जळगाव-पुणे विमानसेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यादृष्टीने विमानतळावरही स्लॉट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती फ्लाय९१ कंपनीचे व्यावसायिक प्रतिनिधी नैमिष जोशी यांनी काही दिवसांपूर्वी दिली.

त्यानुसार आता गोवा-जळगाव-पुणे विमानसेवेची वारंवारता वाढविण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. Fly91 ने नुकतेच जळगाव ते पुणे फ्लाइटचे हिवाळी वेळापत्रक जाहीर केले. 27 ऑक्टोबर 2024 ते 28 मार्च 2025 या कालावधीत जळगाव आणि पुणे दरम्यान दैनंदिन उड्डाण सेवा सुरू राहील. यामुळे गर्दीच्या हंगामात खाजगी बसेस तसेच रेल्वे गाड्यांवरील प्रवाशांचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

दरम्यान, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता जळगाव ते पुण्याचे विमान दिवसातून दोन वेळा असावे. जळगाव-मुंबई दरम्यानची विमानसेवाही दररोज करावी आणि उड्डाणाची वेळ संध्याकाळऐवजी सकाळची असावी; जे व्यवसायासाठी मुंबईला जाणाऱ्यांची गैरसोय टाळेल. गुजरात राज्यातील अहमदाबाद आणि मध्य प्रदेशातील इंदूर यांना जोडणारी हवाई सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा प्रवासी आणि व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
Home
YouTub
Telegram
WhatsApp