लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? रक्कम किती वाढेल?; मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात या योजनेची माहिती दिली.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना सदैव प्रिय भगिनींसाठी सुरू राहील. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, सध्याची 1,500 रुपये दरमहा असलेली रक्कम टप्प्याटप्प्याने 3,000 रुपये करण्यात येईल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात सांगितले.

रायगड जिल्ह्यातील मोरबा येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. एक भाऊ या नात्याने महिलांच्या जीवनात आनंद आणावा ही आमची मनापासून इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणींना. 3000रु दिवाळीपूर्वी महिलांना भाऊबीज रूपात देण्यात आले आहेत. आज ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे सर्व महिला भगिनींच्या खात्यात जमा झाले आहेत. आज राज्यातील महिलांच्या खात्यात 17 हजार 200 कोटी रुपये जमा झाले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “माझी बहीण काबाडकष्ट करून कुटुंब चालवते, हे आम्हाला माहीत आहे. अशा कष्टकरी भगिनींसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत बहिणींच्या खात्यात 2.26 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.” राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले आणि सांगितले की, सचिव अनुप कुमार यांच्या अधिपत्याखालील महिला व बालविकास विभागाने या योजनेचा लाभ देण्यासाठी अतिशय वेगाने काम केले आहे.

“राज्य सरकार समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करायचे आहे.” ही योजना महिलांना स्वावलंबी बनवणारी योजना आहे. सरकार युवक, शेतकरी , विद्यार्थी, सर्वांना बळ देत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.