Anganwadi Sevika Diwali Bonus Maharashtra 2024 : राज्य शासनाने नुकताच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून भाऊबीजीच्या निमित्ताने सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भाऊबीजेची भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात अनुक्रमे ५ हजार आणि ३ हजार रुपयांची वाढ करून आठवडाही झालेला नाही. कालच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील अंगणवाडी सेविकांचे मानधन लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
अंगणवाडी सेविका यांना दिवाळी बोनस जाहीर
शासनाने यासाठी 40 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.