Ration On ATM : आतापर्यंत तुम्ही पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी एटीएमचा वापर केला असेल. मात्र आता एटीएममधून रेशनचे धान्य मिळणार आहे. पण हे खरंच शक्य आहे का? रेशन धान्याचे एटीएम कोठे सुरू केले आहे? यावर आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
आतापर्यंत तुम्ही पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी एटीएमचा वापर करत आहात. पण आता एटीएममध्येही रेशनचे धान्य मिळणार आहे. …हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल…पण हे खरे आहे..आता तुम्हाला धान्य घेण्यासाठी एटीएममध्ये जावे लागेल. या रेशन एटीएमची वैशिष्ट्ये काय आहेत? बघूया.
Table of Contents
Ration Card Update 2024 : आता रेशन कार्ड मिळणार एका क्लिकवर…
- ग्रेन डिस्पेन्सिंग मशीन असे या मशीनचे नाव आहे
- रेशनकार्ड क्रमांक आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर धान्य वितरण
- मशिनमधून 5 मिनिटांत 50 किलो धान्याची डिलिव्हरी
- एटीएममध्ये 24 तास धान्य उपलब्ध असेल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सरकार प्रति व्यक्ती ५ किलो गहू किंवा तांदूळ मोफत देत आहे. जागतिक अन्न वितरण कार्यक्रमांतर्गत, ओडिशा सरकारने अन्नपूर्णा मशिनद्वारे एटीएमद्वारे अन्नधान्याचे वितरण प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे… ओडिशाच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांनी सांगितले आहे की हे मशीन ओडिशाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये बसवले जाईल. . पण हे मशीन महाराष्ट्रात कधी आणणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.