महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; IMD ने ‘या’ जिल्ह्यांना दिला सतर्कतेचा इशारा…

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 15, 2024
महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; IMD ने ‘या’ जिल्ह्यांना दिला सतर्कतेचा इशारा…
— The next 24 hours are important for Maharashtra; IMD issued an alert warning to 'these' districts

Maharashtra Rain Latest Update : हवामान खात्याने नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे

Latest Marathi Maharashtra Rain News : राज्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र सकाळपासून हा पाऊस थांबला आहे. आता दुपारपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अशा नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस पडू शकतो. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

मुंबई आणि कोकणचा विचार करता मुंबई शहर आणि उपनगरांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना काम असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. येत्या काही तासांत कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत घडणार फ्री मध्ये संपूर्ण तीर्थयात्रा,शासन निर्णय जारी, काय आहेत अटी व शर्ती? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा