Monsoon update 2024 : मान्सून संदर्भात महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. राज्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच राज्यातील वातावरण दोन-तीन दिवसांपासून ढगाळ आहे. आज मान्सून तळकोकणात दाखल होत आहे. राज्यात मॉन्सून वाटचालीसाठी पोषकस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात वाढत्या उष्णतेने मान्सूनची चिन्हे ; राज्यात या तारखेला पडेल पाऊस…
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज तळकोकणात आज पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचे आगमन होणार आहे. तर 10 जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांसह राज्यात पाऊस बरसणार आहे.
अशातच राज्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. मुंबई आणि परिसरात उकाड्याचा त्रास आहे. तर राज्यातही घामांच्या धारांनी नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे