Signs of Monsoon 2024 : राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये उष्मा वाढत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. मान्सून पुढे सरकत आहे. 19 मे रोजी अंदमानात दाखल झालेला मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. मुंबई आणि कोकणात 10 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी राज्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
राज्यासह देशभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जळगाव आणि अकोल्यात वाढत्या तापमानामुळे गर्दीला बंदी घालण्यात आली आहे. देशात अनेक ठिकाणी पारा ४५ अंशांवर गेला आहे. राज्यातील तापमानानेही ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या तापमानामुळे राज्यात मान्सूनपूर्व पाऊस अपेक्षित आहे. तापमानामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होणे हे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पूरक वातावरण आहे. यासोबतच रेमाल चक्रीवादळही मान्सूनच्या पुढील वाटचालीला दिशा देईल.
मान्सून 2024 चा पहिला पाऊस महाराष्ट्रात पडेल जूनच्या या तारखेला! पंजाबराव यांनी 2024 सालचे दिले मान्सूनचे वेळापत्रक
30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यास तो 10 जूनच्या सुमारास मुंबईसह कोकणात दाखल होईल.त्यानंतर खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या आगमनाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 15 जून दरम्यान मराठवाडा विदर्भ. 20 जूनच्या आसपास मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता आहे.
26 मे ते 30 मे असे पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये 1 जूनपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. १ जूनपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.