लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात! तुमच्या खात्यात ₹३००० आले का ? लगेच तपासा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर एप्रिल २०२६ महिन्याच्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांना बँकेकडून रक्कम जमा झाल्याचे मेसेजही मिळू लागले आहेत.

Author Picture
Published On: May 15, 2026
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात! तुमच्या खात्यात ₹३००० आले का ? लगेच तपासा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर एप्रिल २०२६ महिन्याच्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांना बँकेकडून रक्कम जमा झाल्याचे मेसेजही मिळू लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करणाऱ्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील अनेक महिलांच्या मनात “लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार?” हा प्रश्न निर्माण झाला होता. कारण मे महिन्याचे पहिले दहा दिवस उलटल्यानंतरही एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाला नव्हता. त्यामुळे लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता शासनाने डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. अनेक महिलांना वेबसाईट आणि सर्व्हरच्या समस्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. तरीदेखील ज्या महिलांनी यशस्वीरित्या ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात आता सन्मान निधी जमा होऊ लागला आहे.

किती महिन्यांचे पैसे जमा झाले ?

सोशल मीडियावर एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र सध्या सरकारकडून फक्त एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता म्हणजेच रु ३००० जमा करण्यात येत आहेत. जून चा हप्ता जून महिन्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Healthy Living : पोट सुटलंय? मग सब्जा की चिया सीड्स — वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं ?

तुमच्या खात्यात पैसे आले का ? असे तपासा स्टेटस

अनेक वेळा बँक खात्यात पैसे जमा होऊनही मोबाईलवर मेसेज येत नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी खालील पद्धतीने स्टेटस तपासावे:

• जवळच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या
• मोबाईल बँकिंग अॅपमधून खाते स्टेटमेंट तपासा
• एटीएम मिनी स्टेटमेंटद्वारे व्यवहार पाहू शकता
• काही बँकांमध्ये मिस्ड कॉल सेवेद्वारेही बॅलन्स तपासता येतो

अंतिम पडताळणीनंतर मोठे बदल

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मानली जात आहे. एप्रिल २०२६ अखेर या योजनेची अंतिम पडताळणी पूर्ण करण्यात आली. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे १ कोटी ७७ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. तर जवळपास ६६ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

या बदलानंतर सरकारचा मासिक खर्चही कमी झाला आहे. पूर्वी या योजनेसाठी सुमारे ३६०० कोटी रुपये खर्च होत होते. आता पात्र लाभार्थी कमी झाल्यामुळे हा खर्च जवळपास २६५५ कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे सरकारला वर्षाकाठी तब्बल १० हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता वेळेत मिळण्यासाठी सर्व लाभार्थींनी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती योग्य असल्याची खात्री करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नमस्कार! मी उदय लहासे. सरकारी योजना, शेती, टेक्नॉलॉजी आणि ताज्या अपडेट्स वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लोकांना योग्य माहिती योग्य वेळी मिळावी, हा माझा उद्देश आहे. Gore Sarkar वर तुम्हाला उपयुक्त आणि विश्वासार्ह माहिती नियमित मिळेल.… Read More

Related News
💬 Join WhatsApp