गाडी चालकांसाठी मोठी बातमी! जर तुमच्या वाहनावर HSRP प्लेट नसेल तर डिसेंबरपासून तुमच्या खिशावर मोठा फटका बसणार आहे.
Hsrp Number Plate Dand : आता वेळ संपत चालली आहे! सरकारने 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व वाहनधारकांना HSRP (High-Security Registration Plate) बसवण्याची अंतिम मुदत दिली आहे. यानंतर 1 डिसेंबरपासून जिच्या गाडीवर हा नंबर प्लेट नसेल त्यांना ₹5,000 ते ₹10,000 पर्यंत दंड भरावा लागेल.
Table of Contents
किती खर्च येतो HSRP प्लेटचा?
HSRP प्लेटचा खर्च तुमच्या वाहनाच्या प्रकारावर अवलंबून आहे:
दुचाकी वाहनांसाठी: ₹300 ते ₹500 पर्यंत
चारचाकी वाहनांसाठी: ₹500 ते ₹1,100 पर्यंत
राज्यानुसार हे दर थोडे वेगवेगळे असू शकतात, पण एकूणच हा खर्च फार जास्त नाही.
का दिली सरकारने मुदतवाढ?
अनेक वाहनधारकांनी अजूनही HSRP प्लेट बसवली नसल्यामुळे सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. अनेक ठिकाणी अपॉइंटमेंट मिळवणं अवघड होत आहे, तर ग्रामीण भागात फिटमेंट सेंटर्सची कमतरता आहे. लोकांची सोयीसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आता काय करावं?
- ऑनलाईन पेमेंट करून लगेच अपॉइंटमेंट बुक करा – अधिकृत सेंटर्सवर किंवा ऑनलाइन पोर्टल्सद्वारे
- आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा – RC बुक, आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज
लक्षात ठेवा!
1 डिसेंबर 2025 पासून ट्रॅफिक पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू होईल. HSRP नसलेल्या वाहनांवर तत्काळ दंड आकारला जाईल. या छोट्या खर्चामुळे मोठ्या दंडापासून बचाव होईल.
आता वेळ संपत चालली आहे – लगेच HSRP प्लेट बसवून घ्या आणि दंडाचा त्रास टाळा!