e-Aadhaar App लाँच – आधार अपडेट आणि QR कोड प्रणाली आता अधिक सोपी आणि जलद

भारतीय नागरिकांसाठी लवकरच एक महत्त्वाची डिजिटल सुविधा सुरु होणार आहे. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) संपूर्ण देशभरात नवीन ई-आधार प्रणाली लागू करणार आहे. या प्रणालीमध्ये QR कोड चा वापर करून आधार तपासणी करणे अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित होणार आहे. त्यामुळे आता आधारची छायाप्रती (फोटोकॉपी) बरोबर बाळगण्याची गरज उरणार नाही.

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 31, 2025
e-Aadhaar App लाँच – आधार अपडेट आणि QR कोड प्रणाली आता अधिक सोपी आणि जलद
— e Aadhaar App Qr Code Update 2025

e Aadhaar App Qr Code Update 2025 : भारतीय नागरिकांसाठी एक मोठी सुविधा लवकरच सुरु होणार आहे. UIDAI (यूआयडीएआय) एक नवी ई-आधार प्रणाली देशभरात लागू करणार असून त्यात QR कोड च्या मदतीने आधारची तपासणी करणं अधिक सोपं होईल. त्यामुळे आता फोटोकॉपी बाळगण्याची गरज भासणार नाही.

नवीन e-Aadhaar App च्या माध्यमातून नागरिकांना नाव, पत्ता, मोबाइल नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती घरबसल्या अपडेट करता येणार आहे. ही सेवा २०२५ च्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात लागू होण्याची योजना आहे.

✅ फक्त बायोमेट्रिकसाठीच सेंटरला जाणं गरजेचं

UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले की, नवीन प्रणालीत सुमारे २००० मशीनचे रूपांतर केले जाणार आहे. नोव्हेंबरपासून नागरिकांना फक्त बायोमेट्रिक अपडेट (फिंगरप्रिंट, डोळ्यांचे स्कॅन) साठी आधार सेंटरला जावे लागेल. इतर सर्व अपडेट्स घरून करता येणार आहेत.

✅ सरकारी डेटाबेसमधून माहिती

नवीन प्रणालीत, आधार अपडेटसाठी आवश्यक माहिती थेट सरकारी डेटाबेसमधून घेतली जाणार आहे. यात जन्मप्रमाणपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, मनरेगा डेटा, पासपोर्ट आणि वीजबिल यांचा समावेश असेल. त्यामुळे बनावट दस्ताऐवजांचा वापर कमी होईल.

✅ लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट

UIDAI आता ५-७ आणि १५-१७ वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट अधिक सुलभ करण्यासाठी शाळांमध्ये कँप घेण्याची योजना आखत आहे. यामुळे पालकांची गैरसोय होणार नाही.

✅ नवी प्रणाली कोठे चाचणी होणार?

नवीन QR कोड प्रणालीची चाचणी रजिस्ट्रार ऑफिस, हॉटेल्स अशा ठिकाणी होणार आहे. ही प्रणाली पूर्णपणे सुरक्षित असून वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय माहिती शेअर केली जाणार नाही.

🔍 का खास आहे ही नवीन e-Aadhaar प्रणाली?

  • ✅ कागदपत्रांची आवश्यकता कमी
  • ✅ बनावट कागदपत्रांवर नियंत्रण
  • ✅ घरी बसून आधार अपडेटची सोय
  • ✅ वेगवान, सुरक्षित आणि युजर-फ्रेंडली सेवा
Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा