Upi Kar Tax Spashtikaran 2025 : जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या UPI अॅप्सचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अलीकडे सोशल मीडियावर आणि काही माध्यमांतून असा दावा करण्यात आला होता की 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर सरकार कर आकारण्याचा विचार करत आहे. मात्र आता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टता देण्यात आली आहे.
Table of Contents
काय म्हणालं अर्थ मंत्रालय?
राज्यसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं की सध्या 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या कोणत्याही UPI व्यवहारावर GST किंवा इतर कोणताही कर लागू नाही. तसेच, अशा कर आकारणीचा कोणताही प्रस्तावही सरकारच्या विचाराधीन नाही.
अफवांना पूर्णविराम
सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की 2000 रुपयांहून जास्त UPI व्यवहारांवर कर लावण्याचे वृत्त खोटे आणि निराधार आहे. GST संदर्भातील कोणताही निर्णय GST परिषदेकडूनच घेतला जातो आणि सध्या परिषदेकडून असे कोणतेही सुचवले गेलेले नाही.
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन
सरकारने याहीवेळी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली की UPI आणि अन्य डिजिटल पेमेंट प्रणालींना प्रोत्साहन देणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सध्या P2P (व्यक्ती ते व्यक्ती) किंवा P2M (व्यक्ती ते व्यापारी) व्यवहारांवर कोणताही GST लागू होत नाही.