आठव्या वेतन आयोगामुळे तिप्पट सॅलरी वाढ? जाणून घ्या नवीन अपडेट आणि संभाव्य पगार

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 7, 2025
आठव्या वेतन आयोगामुळे तिप्पट सॅलरी वाढ? जाणून घ्या नवीन अपडेट आणि संभाव्य पगार

8th Pay Commission Salary Hike Update 2025 : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या घोषणा कधी होणार, याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारकडून यासंदर्भात अध्यक्ष आणि टर्म्स ऑफ रेफरन्स (ToR) निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

1.2 कोटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

देशभरातील सुमारे 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना याचा थेट फायदा होईल. 2027 च्या आसपास हा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे.

वेतन आयोग म्हणजे नेमकं काय?

वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे गठीत केला जाणारा एक समिती असतो, जो पगार, भत्ते, पेन्शन आणि इतर लाभांमध्ये सुधारणा सुचवतो. सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या सुधारणा अपेक्षित आहेत.

फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल

नवीन वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 2.86 पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मूळ पगारात मोठी वाढ होऊ शकते.

वेतन किती वाढू शकतो?

  • लेव्हल 1 कर्मचारी: सध्या ₹18,000 पगार असणाऱ्यांचा पगार ₹51,480 पर्यंत जाऊ शकतो.
  • लेव्हल 2 कर्मचारी: ₹19,900 चा पगार ₹56,914 पर्यंत वाढू शकतो.
  • लेव्हल 3 कर्मचारी: ₹21,700 वरून ₹62,062 पर्यंत पगार वाढू शकतो.
  • लेव्हल 6: ₹35,400 चा पगार थेट ₹1 लाखापर्यंत जाऊ शकतो.
  • लेव्हल 10: आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा पगार ₹56,100 वरून ₹1.6 लाखांपर्यंत होऊ शकतो.

अंतिम निर्णयाची प्रतीक्षा

सध्या आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती आणि त्यांच्या कार्यकक्षेची रूपरेषा ठरवण्याचे काम सुरू आहे. सरकारकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

टीप: ही माहिती सार्वजनिक रिपोर्ट्सवर आधारित आहे. अधिकृत घोषणा आल्यानंतरच अंतिम आकडे निश्चित होतील.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा