8th Pay Commission 2026 Salary Hike Tax Impact Beneficiaries : 2026 पासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 ला संपणार असून, त्यानंतर नवीन वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे.
पगारवाढ किती?
संभाव्य अहवालानुसार, आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचार्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये 30 ते 34 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. याचा फायदा सुमारे 44 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.
फायदा किती जणांना होणार?
एकूण मिळून जवळपास 1 कोटी 10 लाख लोकांना याचा थेट फायदा होणार असल्याचं समजतं. वेतन आयोगाची अंतिम अंमलबजावणी होण्याआधी आयोगाचा अहवाल तयार होईल, तो केंद्र सरकारकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर मंजुरी मिळेल.
फिटमेंट फॅक्टरचा परिणाम:
वेतन ठरवताना “फिटमेंट फॅक्टर” महत्त्वाचा घटक ठरतो. 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता, ज्यामुळे मूळ वेतन 7000 रुपयांवरून 18000 रुपयांपर्यंत वाढले होते. नवीन आयोगासाठी हे प्रमाण 1.83 ते 2.46 दरम्यान राहू शकते.
मागील आयोगांचा अनुभव काय सांगतो?
सहाव्या वेतन आयोगात 54% पर्यंत वाढ झाली होती, तर सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात 14.3% आणि भत्त्यांमध्ये 23% वाढ झाली होती. त्याच धर्तीवर नवीन आयोगात देखील वाढ अपेक्षित आहे.
पगाराच्या घटकांमध्ये काय समाविष्ट असतो?
पगार ठरवताना मूळ वेतन, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) यांचा विचार केला जातो. पेन्शनधारकांना मात्र काही निवडक भत्ते दिले जात नाहीत.