5th and 8th Scholarship Scheme 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
5th and 8th Scholarship Scheme 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यभरात 9 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. राज्य परीक्षा परिषद इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेते. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पाच हजार आणि सात हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी ५० गुणांची प्रथम भाषा, १०० गुणांची गणित, एकूण १५० गुणांची परीक्षा सकाळी ११ ते दुपारी साडेबारा या वेळेत होणार आहे. तर 50 गुणांची तृतीय भाषा परीक्षा, 100 गुणांची बुद्धिमत्ता आणि 150 गुणांची परीक्षा दुपारी 2 ते 3:30 या वेळेत होणार आहे.
परीक्षेसाठी 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह, 16 ते 23 डिसेंबर अतिरिक्त विलंब शुल्कासह, 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत विशेष विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येतील. ३१ डिसेंबरनंतर परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही. या परीक्षेसाठी प्रवेश शुल्क 50 रुपये आणि परीक्षा शुल्क 150 रुपये आहे.