दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ; आता इतके पैसे मोजावे लागतील?

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: September 29, 2024
दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ; आता इतके पैसे मोजावे लागतील?

10th and 12th Exam Fee Update : पूर्वीच्या शैक्षणिक साहित्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षा शुल्कात 12 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. महागड्या पेपरमुळे यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी 50 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा शुल्कात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ केली आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने पेपरचा खर्चही वाढतो. त्यामुळे परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता किती पैसे द्यावे लागतील?

यापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ४२० रुपये शुल्क भरावे लागत होते. आता त्यांना या परीक्षेसाठी 470 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. आतापर्यंत बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क म्हणून ४४० रुपये द्यावे लागत होते. मात्र आता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क म्हणून ४९० रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या शुल्कासोबतच प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp