एसटी महामंडळात चालक (Driver) किंवा वाहक (Conductor) पदासाठी अर्ज करत आहात? तर आरटीओकडून मिळणारा PSV बॅचबिल्ला असणे अनिवार्य आहे. हा बॅचबिल्ला नसल्यास अनेक भरतींसाठी अर्ज करता येत नाही.
✔️ वय किमान 20 वर्षे पूर्ण असावे. ✔️ किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक. ✔️ वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर पात्रता अटी संबंधित आरटीओनुसार लागू असू शकतात.
अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा: • आधार कार्ड • रहिवासी दाखला • 10 वीचे गुणपत्रक • वयाचा पुरावा • पासपोर्ट फोटो
सरकारी किंवा अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून Form 1A मधील वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. अर्जासोबत हे प्रमाणपत्र जोडावे लागते.
परिवहन विभागाच्या Sarathi Portal वर जाऊन PSV बॅचसाठी ऑनलाइन अर्ज भरा, आवश्यक माहिती भरून शुल्क जमा करा.
चारित्र्य पडताळणीसाठी स्थानिक पोलीस स्टेशनचे Character Verification Certificate आवश्यक असू शकते. त्यामुळे अर्जापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करा.
ऑनलाइन अर्ज व शुल्क भरल्यानंतर मूळ कागदपत्रांसह संबंधित RTO कार्यालयात जाऊन पडताळणी पूर्ण करा. पडताळणीनंतर पुढील प्रक्रिया सुरू होते.
एसटी भरती, सरकारी योजना, शिष्यवृत्ती, शेती योजना आणि ऑनलाइन सेवांची विश्वासार्ह माहिती नियमित मिळवण्यासाठी Goresarkar.in ला भेट द्या आणि नवीन अपडेट्स चुकवू नका.